आरोग्य व शिक्षणमराठवाडामहाराष्ट्र

या तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून चौदा दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून 14 दिवसांचा कडक लॉकडाउन!

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहा पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या तालुक्यातील 21 गावांमध्ये उद्यापासून चौदा दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.

यासंदर्भात पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी आज संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी 21 गावांमध्ये लाॅकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुढील 14 दिवसांसाठी हा‌लाॅकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या गावांमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. याशिवाय कोरोना चाचणी व व्हॅक्सिनेशन मोहीम राबवली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

मागील 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केला होता दहा दिवसाच्या कडक लाॅकडाऊन नंतर काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरही पंढरपूर तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा तालुक्यातील 21 गावांमध्ये लोक डाऊन चा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे