महाराष्ट्र

खुशखबर ! पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले, जाणून घ्या नवीन दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर आज कमी करण्यात आले आहेत. आज दिल्लीमध्ये, जिथे पेट्रोलचे दर 20 पैसे प्रति लिटरने कमी करून 101.64 रुपये प्रति लिटर केले गेले आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 20 पैसे प्रति लिटरने कमी करून 89.07 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.

सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते सुधारित करतात आणि रोज 6 वाजे पासून पेट्रोल दर आणि डिझेलचे दर जारी करतात.

महानगरांमधील आजचे लेटेस्ट दर जाणून घ्या

आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.64 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेल 89.07 रुपये प्रति लिटर आहे.

आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 107.66 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 96.64 रुपये प्रति लिटर आहे.

आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 99.32 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर आहे.

असे ठरवतात किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे