महाराष्ट्र

”या” माजी आमदाराची तब्बल 234 कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

झूम मराठी न्यूज टीम, 17 ऑगस्ट 2021 :- अंमलबजावणी संचालनालयाने पनवेल, मुंबई येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.

कर्नाळा बँकेत 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.

आरोपपत्रात विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विवेकानंद शंकर पाटील हे चार वेळा आमदार राहिले आहेत. या प्रकरणात त्यांना ईडीने १५ जून रोजी अटक केली होती. ईडीने आज पाटील यांची २३४ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.

या मालमत्तेत कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक भूखंड यांचा समावेश आहे. ईडीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

वर्ष २०१९-२० मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड पनवेल मुंबई विरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान असे आढळून आले की बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेकानंद शंकर पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीमध्ये पैसे टाकत होते.

या दोन्ही संस्था पाटील यांनीच निर्माण केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासादरम्यान असे आढळून आले की ही फसवणूक २००८ पासून सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत करण्यात आलेल्या

तपासादरम्यान असे आढळून आले की ही फसवणूक ६७ बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे ५६० कोटी रुपयांची होती. दरम्यान ईडीने आज पाटील यांची २३४ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक भूखंड यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे