ब्रेकिंग

Chalisgoan | राजधानी दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलनावर विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा चाळीसगाव मध्ये राष्ट्रीय जनमंच पक्षाचे निवेदन देऊन तीव्र निषेध.!

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे जनहिताच्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांवर करण्यात आलेली पोलिसांची कारवाई अत्यंत निषेधार्ह असून राष्ट्रीय जनमंच पक्ष या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या घटनेच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणे ही लोकशाहीची गळचेपी असून सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचे द्योतक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करणे हे कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीला शोभणारे नाही.

राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या प्रमुख मागण्या

  • दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
  • जखमी विद्यार्थ्यांना तातडीने न्याय व योग्य वैद्यकीय मदत देण्यात यावी.
  •  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
  • विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा.
  • भविष्यात शांततापूर्ण आंदोलनांवर अशा प्रकारची दडपशाही होणार नाही, याची केंद्र सरकारने हमी द्यावी.

राष्ट्रीय जनमंच पक्षाचा इशारा

वरील मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. लोकशाहीत जनतेचा आवाज दडपला जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. राष्ट्रीय जनमंच पक्ष जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी केंद्र सरकार आणि संबंधित प्रशासन जबाबदार राहील.

सदर निवेदनावर महा. प्रदेश संघटक देविदास वाघ, महा. प्रदेश सचिव संदीप लांडगे , ज्येष्ठ नेते गणेश राठोड, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर , जळगाव जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी विजय पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष कायदेशीर सल्लागार आघाडी ऍड. महेश मोरे,चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेलीस, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष युवक आघाडी आबा सोनार, चाळीसगाव तालुका बांधकाम कामगार आघाडी प्रमुख अमोल पाटील, भालेराव पाटील,चाळीसगाव शहर युवक आघाडी अध्यक्ष अधिकार पाटोळे आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे