पाचोऱ्यातील ‘तो’ ठाकरेगटाचा बॅनर ठरतोय लक्षवेधी..
पाचोरा टुडे | पाचोऱ्यात दिवाळी शुभेच्छाचा बॅनर द्वारे शुभेच्छाचा वर्षाव होतांना दिसत आहे. शिवतीर्थ बाहेर ठाकरेगटाचा भाऊबीज शुभेच्छाचा बॅनर ठरतोय लक्षवेधी, कधी काळी शिवतीर्थ हे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय होते आणि आज त्याच कार्यालयाचे भाजपा मध्यवर्ती कार्यालयात रूपांतर होतांना दिसत आहे.
पाचोरा शहरातील शिवतीर्थ हे शिवसैनिकांचे कार्यालय असल्यामुळे नेहमी येथे तालुक्यातील शिवसैनिकांची प्रेरणास्थळ असल्याने वर्दळ असायची सन उत्सवात किती तरी दशके याच जागेवर शिवसेनेचा बॅनर लागायचा आणि आजही लागला आहे. आज मात्र हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधत आहे, कारण शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे आज भाजपाचे मध्यवर्ती कार्यालयात रूपांतर झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक या बॅनर कडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे.
या फ्लेक्स बॅनर द्वारे दिवाळी भाऊबीज नववर्ष शुभेच्छाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज राजकीय परिस्थिती बदली आहे.



