पाचोरा भडगाव नगरपालिका मनसेची स्वबळावर..?
दिलीप जय परदेशी @ झूम न्यूज मीडिया
पाचोरा भडगाव राजकारण | मनसेची स्वबळाची तयारी नगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व जागांवर मनसे निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.
सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहेत. राज्य निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. प्रशासनाने पाचोरा भडगाव नगरपरिषद नगराध्यक्षसह वार्ड निहाय आरक्षण सोडत जाहीर झाले असून मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युतीची घोषणा केली मात्र जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव तालुक्यात मनसे सर्वच निवडणूक स्वबळावर लढणार अशी माहिती समोर आली आहे.
https://www.instagram.com/reel/DQESOyWD8M0/?igsh=ZnpjNWd2NjVoOG14
येत्या काही महिन्यात या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या आता काही महिन्यात ह्या निवडणुका होणार असे जाहीर झाले असून लवकर निवडणुकीत होणार आहे.




