महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज ईलेक्ट्रिक बसचं उदघाटन

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज(८ ऑगस्ट) ईलेक्ट्रिक बसचं उदघाटन करण्यात आलं आहे. आता इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वच चर्चा करतात. पण बेस्टने इलेक्ट्रिक बसगाड्या वापरात आणून प्रत्यक्ष कृती केली आहे. कोविड काळातही बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. कर्मचाऱ्यांमुळेच बेस्टला प्रगती करणे शक्‍य होत आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. बेस्ट, लोकल, मेट्रोसाठी एकच तिकीट असावे असे आश्‍वासन निवडणुकीत दिले होते. त्याची आठवणही असून त्यावरही काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बसमुळे प्रदूषण होणार कमी

ईलेक्ट्रिक बसेसमुळे प्रदूषण कमी होणार असल्याची माहिती आहे. बेस्ट उपक्रमाच्या ७४ व्या बेस्ट दिनी पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. २४ अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करणार आहेत. या बसगाड्यांचे किमान तिकीट दर सहा रुपये आहे. पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत साधारणपणे अशा प्रकारच्या १८०० बस ताफ्यात येणार आहेत. साधारणपणे सव्वा ते दीड कोटी रुपये एवढी एका इलेक्ट्रिक बसची किंमत आहे. १२ मीटर लांब आणि ३५ आसन क्षमता असलेली ही बस आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी व्हिलचेअर लिफ्ट बेस्ट बसमध्ये आहे 

बस एकदा चार्जिंग केल्यास दीडशे किलोमीटरपर्यंत प्रवास करता येऊ शकतो. अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टिम सोबतच मोबाईल चार्जिंग की सुविधा या बेस्ट बसमध्ये असणार आहे. पावसाळ्यात बॅटरी खराब किंवा बंद पडणार नाही. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम बसमध्ये असल्याने चालक प्रवाशांना सूचना देऊ शकतो. तर प्रवाशांनाही येणाऱ्या बस स्थानकाची माहिती मिळू शकते. टाटा कंपनीकडून १७५ मिनी आणि १७५ मोठ्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत. आतापर्यंत २२२ इलेक्‍टॉनिक बसेस आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे