महाराष्ट्रराजकीय

सोनिया गांधी आणि राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर !

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाचे नेते तयारी लागले आहेत. असातच आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी मुंबई दौरा करणार आहेत

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्ष कंबर कसताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तर अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप पाठोपाठ आता काँग्रेसने देखील तयारी सुरु केलेली पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेसकडून मुंबईमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते देखील उपस्थितीत राहणार आहे. २८ डिसेंबर ला शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. त्याच दिवशी काँग्रेसचा स्थापना दिन देखील आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे