आपल खान्देश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी महिलेवर उपोषणाची वेळ


नांदगाव(प्रतिनिधी,) मुक्ताराम बागुल – नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या देशाच्या आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची तसेच त्याला संरक्षण म्हणून लावण्यात आलेल्या जाळ्या व शेताच्या स्लॅप ची अत्यंत दयनीय दुर्दशा झाली असून याबाबत अनेकदा तोंडी व लेखी निवेदन देऊन देखील नांदगाव पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

त्यामुळे दिनांक 3 जानेवारी २०२१रोजी शिवस्फूर्ती मैदानावर अमरण उपोषण करणार असल्याचे शिवभक्त सौ संगीता सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. किरकोळ मागण्या यासाठी जर एका महिलेला उपोषणाचा उपोषणास बसण्याची वेळ प्रशासन आणत असेल तर सकल मराठा समाजाच्या वतीने त्याच दिवशी रास्ता रोको व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

नांदेड शहरातील शिवस्फूर्ती मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या अनेक वर्षापासून आहे सौ संगीता सोनवणे लग्न होऊन आल्या दिवसापासून या पुतळ्याची रोज स्वखर्चाने व स्वतः साफसफाई करून करून दिवसाची सुरुवात करतात.

तसेच योगायोगाने म्हणा किंवा दुर्दैव राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे नांदगाव तालुक्यात आमदार शिवसेनेचा आहे तसेच शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच आहे असे असतानाही किरकोळ कामासाठी एका महिलेला आमरण उपोषणासाची वेळ येत असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय पोळ्या भाजणाऱ्याना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जर उपोषण सुरू झाले तर रास्ता रोकोसह तिरु आंदोलन करण्यात येईल व या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे मत भास्कर झाल्टे मराठा समाज समन्वयक नांदगाव तालुका यांनी मांडले आहे.

सौ संगीता सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी गेल्या एक ते दीड वर्षापासून महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी व सुशोभीकरण करण्याची मागणी करत आहे. जर तुम्ही करत नसेल तर मला परवानगी द्या मी माझे मंगळसूत्र मोडून स्वखर्चाने काम करून घेईल असे त्यांनी सांगितले मात्र पालिकेचे पालिका स्वतःही काम करत नाही आणि मलाही करू देत नाही म्हणून मला नाइलाजास्तव 3 जानेवारी २०२१ पासून अमरण उपोषण सुरु करावी लागत आहे. जोपर्यंत काम सुरू होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असेही सौ संगीता सोनवणे शिवभक्त यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे