आपल खान्देश

Pachora Vrundavan Hospital | मृत शिशु प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुध्द दिलेल्या तक्रारीचा वेब मीडियाच्या पत्रकारांनी निषेध करून दिले निवेदन…

पाचोरा, (प्रतिनिधी) शहरातील वृंदावन हाॅस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या शिशुचा तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री तक्रार अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती. तसेच दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सदरचा प्रकार प्रसार माध्यमांना सांगितला होता. याविषयाची येथील पत्रकाराने बातमी वेब पोर्टल मिडियावर व युट्युब चॅनलवर लावल्याने वृंदावन हाॅस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित पिडित कुटुंब, सुधाकर वाघ व वार्तांकन करणाऱ्या पत्रकार प्रवीण ब्राह्मणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आषयाचा तक्रारी अर्ज दिला आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वेब मीडियाच्या पत्रकारांनी स्थानिक आमदार किशोर पाटील यांना भेटून निवेदन दिले असता सदर हॉस्पिटलवर कारवाई होणार असे आमदार किशोर पाटील यांनी असे आश्वसन दिले.

तसेच डीवायएसपी धनंजय येरुळे यांना निवेदन दिले. पिबीसी मातृभुमिचे संपादक प्रविण ब्राम्हणे यांचे नाव चुकीने टाकुन त्यात म्हटले आहे की, अभिव्यक्ति स्वातंत्र्याला धक्का निर्माण करून चुकीचा दबाव टाकणारेची सविस्तर चौकशी करून पिडीताला न्याय देण्याची मागणी डिजिटल मिडीया संघटनेतर्फे आज डिवाएससपी धनंजय येरूळे साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली. संपादक प्रविण ब्राम्हणे सोबत संघटना भक्कम उभी आहे. पाठींबा दर्शवण्यात आला असून पुढे काय स्थानिक लेव्हलवर काय कारवाई होते ते बघणे महत्वाचे ठरणार असून पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी एक जुटीने पुढे एकत्रित येणार असल्याची ग्वाही पत्रकारांनी दिली. यासाठी प्रामुख्याने अजय  जयस्वाल, एन एस भुरे, भुवनेश दुसाने, छोटू सोनवणे, दिलीप परदेशी, निलेश पाटील, रवीशंकर पांडे, गौरी सोनवणे, दिपक मुलमुले, स्वप्नील कुमावत, शरद इंगळे हे पत्रकार तथा संपादक उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे