आपल खान्देश

पाचोरा शहरातील थेपडेनगर येथे काही अज्ञातानीं सागवान झाडांची कत्तल करून काढला पळ!!

पाचोरा शहरातील थेपडे नगर येथील ओपन प्लेस मधील सागवान झाडांची काही अज्ञात कटर मशिन्सच्या सहाय्याने कापण्याचे काम पद्धतशीर करत होते. काही वेळाने तेथे काही लोक आपल्या कडे येत आहॆ असा संशय आल्याने सागाचे कापलेली झाडे तेथेच सोडून आणलेल्या टेम्पोतुन याने पळ काढला दिवसा ढवळा साग झाडे तोडणारा कोण आहॆ हा प्रश्न उपस्थित होत आहॆ.

 

वरील सर्व माहिती परिसरातील रहिवाशीनीं  नंदू शेलार यानां संपर्क साधून दिली असता नंदू शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नंदू भाऊ शेलार यांनी तात्काळ त्या अज्ञाता विरोधात पाचोरा पालिका प्रशासनास लेखी कळवले असता. पालिका कर्मचारी घटनेची पाहणी करून गेले असून त्या तोडलेल्या साग झाडांची जर रात्री मधून अफरा तफर झाली तर याला कोण जबाबदार राहणार. असं उपस्थित नंदू शेलार,घनश्याम पाटील ,शुभम जगताप, कृष्णा पाटील या नागरिकांनी आपले म्हणणे मांडून प्रशासना विरोधात राग व्यक्त केला. तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अशी माहिती प्रतिनिधीला देण्यात आली. काय कारवाई होते याच्यावर लक्ष लागून आहॆ.

बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरला जात असल्याने या लाकडांची मागणी खूप असल्याने साग चोरांचा सुळसुळाट वाढला असून याविरोधात कारवाई कशी होते याकडे कटाक्षाने पाहिले जाईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे