आपल खान्देश

‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा लिहिलेले टी-शर्ट घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न…


जळगाव (झूम) मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे जळगाव जिल्‍ह्यात आले आहेत. त्‍यांचे दुपारी ३:३० च्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते पाळधी येथे कार्यक्रमासाठी जात होते. यापूर्वीच राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) मुख्‍यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याची तयारी होती. ज्यांनी ५० खोके देऊन आमदार विकत घेतले आहेत, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.

माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांचे जळगावात आगमन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा लिहिलेले टी-शर्ट घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी आंदोलनापूर्वी कार्यकर्त्यांना ताब्‍यात घेतले. कुठलीही परवानगी न घेता हे बेकायदेशीर आंदोलन करण्यात येणार होते. याबाबतची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.

 


!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे