ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

गणपतराव देशमुख यांचं निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते.

धनगर नेते तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला

तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आबासाहेबांच्या जाण्याने आमच्या देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंत चांगली होती. पण आज संध्याकाळी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचं निधन झालं” अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे