ब्रेकिंग

यावल नगर परीषद मुख्यधिकारी बबन गंभीर तडवीनां लाच स्वीकारताना अटक

जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केली. साठवण बंधार्‍याच्या कामांसाठी एका कंत्राटदाराला काम मिळवून देण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी लाच मागितली होती. यामुळे संबंधीत कंत्राटदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास यावल येथील नगरपालिकेत सापळा रचला. यात मुख्याधिकारी बबन तडवी हे 28 हजार रूपयांची लाच घेतांना अडकले. त्यांना ACB पथकाने रंगेहात अटक केली. अटक करताच त्यांना घेऊन पथक जळगावकडे रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका परिसर अक्षरश: हादरला.

मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर आधी देखील अनेकदा आरोप करण्यात आले होते. बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आज थेट त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे