आपल खान्देशमहाराष्ट्र

Audio Clip: महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचं वाळू माफियांशी लैंगिक शक्तीवर्धक गोळ्यांसाठी साटंलोटं

अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधी प्रकरणी रात्री उशीरा अंबड पोलिसांनी जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे

जालना: अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधी प्रकरणी रात्री उशीरा अंबड पोलिसांनी जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयासामोर हजर करण्यात आल्याने न्यायालयाने त्यांची चार दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसानी संदीप लिंबा पाटील, समाधान भानुदास पाटील या दोन आरोपीना जळगाव शहरातून तर स्वप्नील उर्फ धनु विलासराव देशमुख याला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातून अटक केली आहे.

हे आरोपी या सर्व औषधाचे स्टोकिस्ट असल्याची माहिती समोर येत असून राज्यातजालन्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वाळू माफियांकडून या गोळ्यांचा पुरवठा केला जात होता अशी धक्कादायक बाब वाळू माफियाकडून व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिप मधून सामोर आली आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये “चॉकलेट” या सांकेतिक नावाने या गोळ्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या या ऑडियो किल्पमध्ये या गोळ्यांचा उल्लेख करताना आढळून आला आहे. व्हायरल क्लिप सामोर आल्याने ही धक्कादायक बाब सामोर आली आहे, आता या प्रकरणी चौकशी झाल्यास यात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ऑनलाइन पद्धतीने पैसे घेऊन अवैधरित्या मेडिकल स्टोअर ला ही औषधं पुरवीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मोठं मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेडरे राज्य भर परल्याची शक्यता वर्तविवली जात आहे.

■ काय आहे नेमका प्रकार

गर्भपात, गुंगीकारक औषधांचा अवैधरित्या खरेदी- विक्रीच्या उद्देशाने या प्रकरणी २ जणांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने, जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषध विक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अंबड परिसरात अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधाची विक्री करणारे २ जणांना दुचाकीवरून, विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन जालना कार्यालयाच्या औषध निरीक्षकांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. अंबड- जालना महामार्गावरील पारनेर फाटा परिसरात दुचाकी वरून, दोन काळ्या बॅग घेऊन जात असताना त्यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता. त्यांच्या बॅगमध्ये गर्भपातासंबंधीत तसेच गुंगीकारक आणि पुरुषांचे कामवासना वृद्धिंगत करणाऱ्या या बाबद अधिक चौकशी केली असता, औषधीचे खरेदी विक्रीसाठीचा परवाना नसल्याचे धक्कादायक बाब सामोर आली आहे.

औषध विक्रीचा कोणतेही परवानगी नाही. ही अवैध रित्या विक्री केल्या जात होती.औषधीचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे