आपल खान्देश

पाचोरा शहरातील महानुभाव समाज स्मशानभुमीची जागा शासन दप्तरी नावे लावण्याची मागणी….

  • दिलीप जय परदेशी

जळगाव  पाचोरा येथील महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधवांनी पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी व तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी पाचोरा यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की पाचोरा येथे सर्व महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव बहुसंख्येने वास्तव्य करीत आहोत.तसेच आम्ही पिंढ्यापिढ्यांपासून आमच्या समाजाच्या रुढी, परंपरा तसेच रितीरिवाजा प्रमाणे समाजातील कोणतेही धार्मीक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम करीत असतो. जसे की, लग्नसमारंभ, अंत्यविधी यासारखे सर्व विधी समाजाच्या रुढी, परंपरा व रितीरिवाजाप्रमाणे होत असतात. 

महानुभाव समाजात अंत्यविधी हा दफन करुनच केला जात असतो. पाचोरा येथील नगरपरिषदेच्या अधिनस्त असलेली परधाडे रस्त्यावरील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर या जागेत,  पिढ्यापिढ्यांपासून महानुभाव समाजाच्या रुढी व परंपरेनुसार समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी करीत आलेलो आहोत. गेल्या काही वर्षापुर्वी सदर जागेच्या काही भागामध्ये नगरपरीषदेने वॉटर प्युरिफायर प्लॉट उभारलेला आहे. परंतू उर्वरीत जागेत आमची दफनभूमी आहे.

तरी पाचोरा येथील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर यातील नगरपरिषदेने उभारलेला वॉटर प्युरिफायर प्लॉट सोडून उर्वरीत जागा ही आमच्या दफनभूमीची आहे. सदर जागेत पुर्वीपासुन आम्ही आमच्या समाजातील अंत्यविधी हा बऱ्याच पिढींपासून करीत आलेलो आहोत. आमच्या समाजातील लोक, नातेवाईक, आजोबा, पंजोबा यांचे अंत्यविधी या ठिकाणीच करण्यात आलेले आहेत. परंतू याठिकाणी संपुर्ण मोकळी जागा असुन, काही भागात नगरपरीषदेचा कचरा डेपो देखील आहे. त्यामुळे स्मशानभूमी ही स्मशानभुमी वाटत नसुन सर्व जागेची नासधूस झालेली आहे डेपोतील सर्व कचरा देखील दफन केलेल्या प्रेतावर जाऊन बसतो. त्यामुळे सर्व समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. सदरची जागा कागदोपत्री शासन दरबारी समाजाच्या स्मशानभूमीच्या नावे नाही. त्याचप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. जसे की, स्मशानभूमी पर्यंत पोहोच रस्ता नाही, जमीन सपाटीकरण नाही, पाण्याची सोय नाही. कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा नाही, ऊन, पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी कोणतेही शेडचे बांधकाम नाही, दफनभूमीस सरंक्षण भिंत नाही. तरी सदर निवेदनाद्वारे आपणांस सर्व महानुभाव पुजारी, उपदेशी समाज बांधवांच्या स्मशानभुमीसाठी सदर जागा नावे लावण्यात यावीत यासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.यानिवेदनातत पुढिल मागण्या आहेत.

पाचोरा येथील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर यातील नगरपरिषदेने उभारलेला वॉटर प्युरिफायर प्लॉट सोडून उर्वरीत जागेची मोजणी करुन तशा हद्दी-खुणा गाडून सदरची जागा ही सर्व महानुभाव पूजारी, उपदेशी समाज बांधवांच्या स्मशानभुमीच्या नावे शासन दप्तरी करण्यात यावी. सदर स्मशानभूमी पर्यंत पोहोच रस्ता करुन मिळणे.

दफन भूमीमध्ये अंत्यकर्म करण्यासाठी आलेल्यांना बसण्याची तात्पुरती सोय होण्यासाठी अनुरुप शेडची व्यवस्था करणे.दफन भूमीसाठी आवश्यकतेनुसार कुंपण वा भिंती घालून जागेची सुरक्षितता करुन मिळणे. दफनभूमी मध्ये विद्युत खांब नाहीत, त्याठिकाणी खांब उभारुन दफन भूमीतील विद्युत खांबावर सीएफएल अथवा ट्युबलाईट तसेच दफन भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्याची व्यवस्था करणे.दफन भूमीत येणाऱ्या लोकांना अंत्य विधीसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन मिळणेसाठी स्मशान भूमीपर्यंत नळ घेवुन पाण्याचा हौद बांधण्यात यावा.सदर स्मशानभूमीची व तेथील सुविधांची देखभाल व दुरुस्ती पाचोरा नगरपरीषदतर्फे शासकीय योजनेअंतर्गत करुन मिळावी.अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी महानुभाव पंथ पुजारी भोपे समाजाचे तालुकाध्यक्ष श्री मिलिंद पुजारी, ॲड. सुदर्शन पुजारी, पो.नि. दीपक पुजारी, विलासराव बिडकर, राहुल बिडकर, अजय पुजारी, तुषार पुजारी, प्रकाश पुजारी, चेतन पुजारी, फुलचंद पुजारी, चुडामन पुजारी, गोविंद पुजारी, प्रशांत पुजारी तसेच महानुभाव पंथीय व उपदेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे