ब्रेकिंग

पाचोऱ्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

# पाचोऱ्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पाचोरा (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाचोऱ्यातील जय किरण प्रभाजी संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. योगामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते, एकाग्रता वाढते तसेच तणाव कमी होण्यास मदत होते, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

शाळेच्या परिसरात सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. डॉ पंकज नानकर यांनी योगा आणि योगाचे महत्व सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा,उपाध्यक्षा गौरी कुलकर्णी,सचिव जीवन जैन,सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया,स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी,स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी,संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा,गोपाल पटवारी,प्रिती जैन,संगिता बोथरा,महेंद्रकुमार हिरण,अशोककुमार मोर,शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील,प्रतिभा मोरे,रुपाली जाधव प्रिती शर्मा,पुजा पाटील,ज्योती बडगुजर,कविता जोशी,अश्विनी पाटील

भाग्यश्री ब्राम्हणकर,विद्या थेपडे,शितल महाजन,स्मिता देशमुख,किशोरी साळुंखे,वाल्मिक शिंदे,किरण बोरसे,शालिनी महाजन,रुक्मिणी कासार,मंदास्मिता पाटील,उज्वला पाटील,हर्षा वाधवा, सानिका पाटील,निवृत्ती तांदळे,कृष्णा शिरसाठ,आनंद दायमा,मनोज बडगुजर,सुनिता शिंपी,शितल पाटील,उज्वला गायकवाड,शिवाजी पाटील,विकास मोरे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे