महाराष्ट्रराजकीय

शरद पवारांना असा मुख्यमंत्री चालतो कसा ?”, नारायण राणेंचा बोचरा सवाल

यंदाच्या राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गदारोळ पाहायला मिळाला आहे. आजपासून (५ जुलै) सुरु झालेले राज्याचे पावसाळी अधिवेशन भाजप आमदारांचा गदारोळ आणि भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन यामुळे चांगले गाजले आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित वादग्रस्त मुद्दे असतानाच आता पुन्हा एकदा या नव्या मुद्द्यांवरून राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. त्यातच आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सवाल करत थेट उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले आहे.

नारायण राणे म्हणाले कि, देशात गेली दिढ वर्ष कोरोनाच संकट आहे. राज्यात कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा अत्यंत बोचरा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सरकारने १२ आमदारांना निलंबित केलंय | नारायण राणे

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे मांडले जाणार आहेत अशी अशा आहे. तरी पहिल्या दिवशी १२ आमदारांना पुढच्या वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत. आमदारांच्या निलंबनावरूनही राणे यांनी मोठं विधान केलं. “सरकार वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने १२ आमदारांना निलंबित केलंय. त्यांनी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे”, असा गौप्यस्फोटही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे