नाशिक, देवळाली मतदारसंघ संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..
नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नाशिक, देवळाली मतदार संघाच्या संविधान आर्मीच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. सातपूर संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिक, देवळाली मतदारसंघ, सातपूर संविधान आर्मीच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक येथे शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. संविधान आर्मीच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संविधान अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. तसेच संविधान जनजागृती संदर्भात विविध उपक्रम कसे राबवता येणार जेणेकरून विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान तळागाळातील जलसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्ग क्रमण कसे करता येणार याविषयी संविधान तज्ञ डॉक्टर सुवर्णा सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संविधान आर्मीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई काळे, श्रीमती दुर्गाताई शिरसाठ, सौ नीता गांगुर्डे, सौ रंजना बागुल, श्री प्रशांत जाधव, श्री भिमराव शिंदे, श्री संजय जगताप, श्री अशोक शेंडगे, श्री छबुराव साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



