आपल खान्देश
धुळे जिल्हा परिषदेचा अखेर बिगूल वाजला!!
अखेर धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झालीय. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील जिल्हा परिषद सदस्यांच्या रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी जुलैला मतदान होणार आहे.
एकाच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजित आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषित करण्यात आले होते. मात्र घोषित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावनी होऊन उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारणीला मुदतवाढ दिली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरक्षणा संदर्भातील सर्व याचिका दाखल करून घेत न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्याचे आदेश आयोगाला दिले.
नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 29 जुन ते 5 जुलै पर्यंत मुदत असणार आहे. 6 जुलैला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. 19 जुलैला मतदान होणार असून 20जुलैला निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे.




