महाराष्ट्र

बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप!

मुंबई | सध्या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच देण्यात आली आहे. मात्र , बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सध्या मध्य रेल्वेतून 18 लाख प्रवासी प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून 11 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास घेणे बंधनकारक राहणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे