आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
एस. एम. एम. नेत्र कल्याण चॅरिटेबल ट्रस्टला राज्यपालजी कडून सदिच्छा भेट
Published by Vaibhav kale @ Editor -Zoom Marathi News media.
महाराष्ट्राचे राज्यपाल, महामहिम भगतसिंग जी कोश्यारी यांनी रविवारी १ जून रोजी नागपूरच्या सोमालवाडा येथील महात्मे आय बँक नेत्र रुग्णालयात सदिच्छा भेट दिली. 1986 पासून एस. एम. एम. नेत्र कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हे नेत्र रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था समाजसेवेबाबत आपली वचनबद्धता कायम ठेवत आहे. माननीय राज्यपालांनी लाखो लोकांना मोफत शस्त्रक्रिया व उपचार दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.
ते म्हणाले की, महात्मे हॉस्पिटलच्या नेत्र तंत्रज्ञ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार देऊन तरुणांना सक्षम बनविणे महत्वाचे आहे.
त्यांनी रूग्णालयाच्या सहकार्यांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर-रूग्ण संबंध, नैतिकते या विषयावर भाषण केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री.मधुकरराव कालमेघ, अनिल वैरागडे, डॉ.सुनीता महात्मे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कानडे, डॉ. निखिलेश वागडे आदी उपस्थित होते.



