Pachora पाचोरा मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा आणि जय महाराष्ट्र

पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा शहरअध्यक्ष ऋषिकेश भोई यांचा जय महाराष्ट्र करत आपल्या पदाचा राजीनामा देत जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांना देण्यात आला असून ते पुढे कोणत्या पक्षात जातील हे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र सह पाचोरा तालुक्यात निवडणुक रंगात आली असतांना पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा शहरअध्यक्ष ऋषिकेश भोई यांनी जय महाराष्ट्र..! करत पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती झूम मराठी कडे देण्यात आली, वैयक्तिक कारण देऊन राजीनामा जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या कडे देण्यात आला आहे.
राज ठाकरे यांचे सैनिक म्हणून ऋषिकेश भोई हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तरुणचेहरा म्हणून ओळखले जात होते प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग होता त्यांच्या कडे काही वर्षांपूर्वी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, आता ऋषिकेश भोई यांचा खाजगी राजीनामा आहे की ते नाराज आहेत ते लवकरच कळेल असे सूत्रा नुसार कळले आहे.


