आपल खान्देशराजकीय

बांबरुड राणीचे विकास सोसायटीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय!, भाजप प्रणित पॅनलचा उडाला धुव्वा..


पाचोरा- बांबरुड राणीचे विविध कार्यकारी कृषी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या खंबीर नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणित सहकार पॅनलने भाजप प्रणित पॅनलचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला असून पॅनलचे सर्व च्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या खंबीर नेतृत्वात संस्थेने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली असून शेतकरी हित लक्षात घेऊन सर्वसमावेशक व लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या सुज्ञ व शेतकरी उमेदवारांना संधी मिळावी म्हणून सहकार पॅनलवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवत सहकार पॅनल संधी दिली आहे.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-

सर्वसाधारण मतदार संघ गटातून दारकोंडे अशोक रामदास गोराडे रवींद्र माणिक जगताप राजेंद्र जयराम, कोकणे महादू बना, मेवाती उस्मानखा, शिंदे माणिक विठ्ठल, सूर्यवंशी निवृत्त शामराव, वाघ ईश्वर सिताराम, महिला राखीव मतदारसंघातून पाटील छायाबाई रवींद्, पाटील सुरेखा प्रका, इतर मागासवर्गीय गटातून वाघ मधुकर ओंकार, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून वडर महारु रामा सहकार पॅनलच्या यशासाठी संजय वाघ, दगाजीराव वाघ,ललित वाघ,शशिकांत वाघ, झुंबरलाल जैन, तोताराम कोकणे, नबी पिंजारी,हिंमत पाटील,बाबूलाल गरुड रवींद्र काटे, अरुण शिंदे, देवराम गवळी, आबा वाणी, जयराम कोळी, दिलीप परदेशी, उत्तम बडगुजर, बुऱ्हाण तडवी,पांडुरंग पाटील, नाना पाटील ,सुभाष वाघ, शिवाजी काळे, मेहमूद मेवाती, पंजाबराव आढाव, भागवत शेवगे, बाळू चव्हाण, शिवाजी गरुड, नामदेव जगताप,समाधान डांबरे,भीमराव काटे, वसंत वाघ,सुभाष पवार, नामदेव जगताप, जगदेव जगताप, सिताराम दारकोंडे, प्रकाश चौधरी,युवराज काळे, मुराद तडवी यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे