महाराष्ट्र

पंढरीची वारी या वर्षी पायी नाही

पाऊले चालती पंढरीची वाट’या गजरात आपल्या पांडुरांगच्या भेटीला मोठ्या भक्तीभावाने जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी आषाढी वारी हा एक उत्सव असतो, त्यांचा उत्साह महाराष्ट्र कित्येक वर्षांपासून पाहत आलाय. पण, सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्याला कडेवर हात ठेवून उभा असलेल्या प्रिय पांडुरंगापासून सोशल डिस्टंसिंग ठेवण्याची वेळ आलीये. गेल्या वर्षीही आळंदी – पंढरपूर पायी वारी झाली नव्हती. यंदा कोरोनाची दुसरी लाट आली आणि ओसरली. पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून वारकऱ्यांना पायी वारी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपुरात पालखी आगमनापर्यंत पालखी सोहळा कसा होईल याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीये.

पंढरीची वारी या वर्षी पायी नाही. आषाढी वारी यंदाही बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी आज दिली. पवार म्हणाले की,अनेक जणांची यंदा पायी वारीसाठी मागणी होती. मात्र ते करू नये अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येत नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे