देश-विदेशमहाराष्ट्र

तुमचं बँक खातं रिकामं करण्यासाठी व्हाट्सअपवर रचला जातोय गुलाबी सापळा?

इंटनेटनेट (Internet) मानवजातीचे आयुष्य प्रचंड सोप्पे बनवले आहे. शारिरिक कष्टाला कमी करण्याचं मोठं काम इंटनेटमुळं होतं आहे. जगाला आणखी जवळ आणण्याच काम इंटनेट करतंय. मात्र आपण ही गोष्ट कधीही विसरता कामा नये की तंत्रज्ञान दुधारी तलवारी सारखे असते. इंटनेटचे जशे फायदे आहेत तसे तोटे ही आहेत. आपण सतर्क राहूनच आपलं रक्षण करु शकतो. ऑफिसचे काम असो किंवा खरेदीचे तपशील, सर्व काही व्हॉट्सअॅपद्वारेच (WhatsApp) केले जातात. व्हॉट्सअॅपशिवाय बहुतांश लोकांचे आयुष्य अपूर्ण आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे अॅप प्रत्येकाच्या मोबाइलवर डाउनलोड करण्यात येतं. मात्र सावधान या अॅपला वापरताता आपण निष्काळजी पणाने वागलो तर याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागु शकते.

तुमच्या मोबाईलवरही तुम्ही व्हॉट्सअॅप डाऊनलोड असेल तर हा लेख तुम्ही काळजीपूर्वक वाचायला हवा. व्हॉट्सअॅपमध्ये कलर घोटाळा सुरू झाला आहे. व्हॉट्सअॅप हे प्रत्येक रंगाचे आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये गुलाबी रंगाचे व्हॉट्सअॅप (Pink Whatsapp) असेल तर याचा अर्थ तुम्ही सायबर क्राईमचे बळी झाला आहात. हे गुलाबी व्हॉट्सअॅप फक्त तुमचा सर्व डेटा चोरणार नाही तर तुमचे बँक खाते देखील रिकामे करेल. काही दिवसांपासून व्हाट्सअपच्या पिंक फ्रॉडच्या अनेक घटना वरचे वर समोर येत आहेत.

सोशल मीडियाचा सर्वात मोठा घोटाळा!

 गुलाबी व्हाट्सअपचा हा घोटाळा नेमका आहे तरी काय हे आधी जाणून घ्यायला हवं. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नवीन व्हॉट्सअॅप लॉन्च झाल्याचं नोटिफिकेशन येईल. तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट केले पाहिजे असे या मेसेजमध्ये असे सांगितलं जाईल. नवीन व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचे असेल. त्यात आधीच्या व्हॉट्सअॅपपेक्षा अनेक फीचर्स असतील. हे गुलाबी व्हॉट्सअॅप दिसायलाही खूप सुंदर दिसते. यामध्ये लोकांना अडकवण्यासाठी व्हॉट्सअॅपचे अनेक फिचर्स जोडले जातात. 

पिंक व्हाट्सअप म्हणजे रेड अलर्ट….

काही दिवसांपासून नव्या अपडेटेड व्हाट्सअपला इंस्टॉल करण्यासाठीचे संदेश पसरवले जातायेत. वास्तविक हे व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर नसून घोटाळेबाजांची युक्ती आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमचा संपूर्ण डेटा या सायबर गुन्हेगारांकडे जाईल. मेसेज पाठवणाऱ्याला तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये पडलेले सर्व फोटो, बँक डिटेल्स, महत्त्वाचे मेसेज यावर नियंत्रण मिळेल. यापूर्वीही अनेक बाबतीत असे घडले आहे. ज्यांनी हे व्हॉट्सअॅप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा डेटा लीक झाला आहे..

तुमचा गोपनीय डाटा त्यांना चोरायचा आहे

एकदा का या घोटाळेबाजांना तुमचा गोपनीय डेटा पकडला की, तुमच्या खात्यातून पैसे काढणे त्यांच्यासाठी खूप सोपे होते. बहुतेक लोकांची बँक लिंक खाती फक्त व्हॉट्सअॅपशी जोडलेली असतात. जर कोणी बँकेला ओटीपी पाठवला तर तो फक्त त्यांच्याकडे जाईलं त्यांच्यासाठी व्यवहार करणे खूप सोपे आहे. तुमचे महत्त्वाचे मेसेज कोणीतरी वाचत आहे हे तुम्ही समजू शकणार नाही.

ताबोडतोब हटवा गुलाबी व्हाट्सअप

आता या गुलाबी घोटाळ्याचे जाळे देशभर पसरले आहे. देशभरातील पोलिसांनी मेसेज पाठवून लोकांना या घोटाळ्याबद्दल जागरुक करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हालाही असा काही मेसेज आला तर त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. जर तुम्ही हे गुलाबी व्हॉट्सअॅप आधीच डाउनलोड केले असेल तर ते लगेच डिलीट करा. तुम्हाला माहिती असायलाच हवे की व्हॉट्सअॅप फक्त हिरवे असते, गुलाबी रंग फक्त तुम्हाला फसवण्यासाठी बनवलेल्या सापळ्याचा भाग आहे.

Disclaimer : सदरील माहिती पुस्तकं, वर्तमानपत्रं, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे. यात आम्ही सत्यतेचा दावा करत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे