आपल खान्देशराजकीय
२४ तासात भाजपाने शिवसेनेला दिला झटका, सेनेचे नगरसेवक फोडले!
मुंबई |भाजपाच्या सहा नगरसेवकांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घटनेला २४ तास उलटण्याच्या आतच भाजपाने शिवसेनेला दणका दिला आहे. जळगाव मुक्ताईनगर महापालिकेतील भाजपाचे सहा नगरसेवक काल शिवसेनेने फोडले. त्यानंतर आज भाजपाने माथेरानमधील शिवसेनेचे दहा नगरसेवक फोडले.
माथेरानमधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. माथेरान प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून हा भाग ठाणे जिल्ह्यात येतो. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार नेते आहेत. त्यांची या भागावर बऱ्यापैकी पकड आहे. त्यामुळे दहा नगरसेवकांनी फुटून भाजपात प्रवेश करणे, हा शिवसेनेसाठी मोठा झटका आहे.



