आपल खान्देशमहाराष्ट्र

भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांची बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

जालना: जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिस मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील एका खाजगी रुग्णालायात 9 मे रोजी उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर काही युवकांनी डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचे म्हणत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरवात केली

याची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी कदीम जालना पोलिसांनी लाठीचार्ज करत भाजप युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे.

या मारहाणीत पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ‘साहेब माफ करा, साहेब माफ करा’ अशी याचना भाजपच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायलर झाल्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे