आपल खान्देशकृषीवार्ता
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा शिवारात बैल जोडी चोरी!
दिलीप परदेशी
पाचोरा (प्रतिनिधी) करोनाने शेतकरी मेठाकुटीस आला त्यात तालुक्यातील खडकदेवळा शिवारातून काल रात्री दोन बैल व एक गाय चोरी गेली आहेत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकदेवळा तालुका पाचोरा येथे पुंडलिक पाटील यांच्या मालकीची बैलजोडी व दुधाळ गाय यांची कालरात्री चोरी झाली असून या अल्पभूधारक शेतकरयाला मोठा आर्थिक फटका बसला आहे ऐन पेरणीच्या वेळेस बैलजोडी चोरी झाल्याने शेतकरी पुंडलिक पाटील आर्थिक संकटात सापडले आहे सध्या तालुक्यातील गुरेढोरे चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अन्यथा चोरीचे प्रमाण वाढत राहील.



