महाराष्ट्र

करोना 19 मुळे श्रीक्षेत्र चौँडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम रद्द!

कोरोनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम रद्द

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी ३१ मे ला त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत होतो. परंतु , कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत महाराष्ट्रात लॅाकडाऊन असल्याने यावर्षी ” श्री क्षेत्र चोंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांचा २९६वी जयंती कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीही आपण क्षेत्र चोंडी येथे जयंती साजरी करू शकलो नव्हतो.आपणा सर्व अहिल्या भक्त व श्रद्धाळूंना नम्र विनंती करतो की, सोमवार दि. ३१ मे २०२१ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती कोरोना महामारी असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून घरीच जयंती साजरी करावी अस आवाहन राम शिंदे यांनी केलं आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे