आपल खान्देश

कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी निदर्शने

झूम मराठी जळगाव । कोरोना काळात कोविड १९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रुषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून जोरदार निदर्शने करण्यात आले.

जगभरात कोरोना महामारीने उच्छाद मांडल्याने अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोरोनाची दहशतीने मंत्री,आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी लोकांपासून स्वतःला दूर करून घेतले होते. अशा वेळी कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, कक्ष सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आदींनी जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णाची सेवा सूश्रुषा केली. मात्र या कोरोना योद्ध्यांना अचानक कमी करण्याचा अन्यायकारक निर्णय शासनाने घेतला. याचा निषेध व्यक्त करत कोविड काळात कोरोना रुग्णाची काळजी घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी कोरोना योद्धयांनी जनक्रांती मोर्चाच्या नेतृत्वात प्रचंड घोषणांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल.

कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही – महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचा इशारा..

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाकडे भीतीपोटी जवळचे नातेवाईक सुध्दा जाण्यास घाबरत होते.अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाची सेवा करणारे कंत्राटी कामगार हे जीवनदायी ठरले. या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची न्याय मागणी दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा संपूर्ण राज्यभरात मोठे जनआंदोलन उभारेल व मंत्र्यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही असा गर्भित इशारा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी या वेळी दिला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे