गुन्हेगारी

दिराकडून वहिनीवर बलात्कार करून, गळा आवळून हत्या

पिंपरी चिंचवड : देहू रोड परिसरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहितेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन तिचा ओढणीने खून केल्याचा आरोप दिरावर आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला. हत्येप्रकरणी तिचा चुलत दीर तुकारामला पोलिसांनी ताब्यात घेतले. आपणच वहिनीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

आरोपी तुकारामने वहिनीला देहू रोड जवळील घोरवडेश्वर येथील मंदिर पाहण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेले. तुकारामने मित्र अक्षयला फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर दीर तुकाराम आणि त्याचा मित्र अक्षय या दोघांनी घोरवडेश्वर येथील डोंगरावर घेऊन जाऊन वहिनीवर बलात्कार केला. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून, चेहऱ्यावर दगड टाकून तिची हत्या केली.दरम्यान या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे