ब्रेकिंग

Pachora Crimes | पाचोरा शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार..!

सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना

पाचोरा शहरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार घडत होता. पीडितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी दोघा मुख्य आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या एका तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पाचोरा येथील रहिवासी असून ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव आरोपींना होती. संशयीत आरोपीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिक दबावाखाली ठेवले. या भीतीचा गैरफायदा घेत त्यांनी तिला काकणबर्डी परिसर तसेच अंतुर्ली रोडवरील शेतात नेऊन वेगवेगळ्या वेळेस जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे