आपल खान्देश

गणेशोत्सवाच्या उत्साहाला छेद देणारी हृदयद्रावक घटना शहरातील तळेले कॉलनी परिसरात घडल्याने खळबळ उडाली. सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीने आपल्या चार वर्षीय मुलासह जीवन संपवल्याने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महाजन कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीची धावपळ सुरू होती. याचदरम्यान हेमांगी यांनी मुलासह टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. काही वेळाने कुटुंबीय हेमांगी यांना बोलावण्यासाठी संबंधित खोलीकडे गेले असता दरवाजा बंद असल्याचे आढळले. आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली

माय-लेकाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हेमांगी यांनी मुलासह एवढे टोकाचे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले, याचा शनिपेठ पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासाठी कुटुंबीय, नातेवाईक तसेच संबंधित व्यक्तींकडून घटनेपूर्वीची परिस्थिती आणि कुटुंबातील घडामोडींबाबत माहिती घेतली जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे