राजकीय

माझ्यावरचा हल्ला सुनियोजीत; मंत्री जयंत पाटलांसह पोलीस अधिकारी कटात सामील : गोपीचंद पडळकर

७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्‍यावर हल्‍ला झाला. हा हल्‍ला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सुनियोजित कट आहे, असा आराेप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्‍हिडिओ व्हायरल केला. यासंदर्भात ते म्हणाले की, हा हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या दारामध्ये झाला. व्हीडीओ चित्रीकरणात हा हल्ला किती सुनियोजीत होता हे दिसून येते. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीचा वेग कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा आणि मग जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा असा हा सुनियोजीत कट आखण्यात आला होता, असा आराेपही त्‍यंनी केला.

आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतं. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय. आणि ती घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरण केले जात आहे. या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अतिरिक्‍त पाेलिस अधीक्षक मनिषा डुबुले हे सामिल आहेत, असा आरोप पडळकर यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे