ब्रेकिंग

हैस वेल्फेहर फॉउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती..

झूम मराठी वृत्त – हैस वेल्फेहर फॉउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील नियुक्ती करण्यात आली असून ते पारोळा तालुक्यातील प्रीपी येथील समाजसेवक अशी त्यांची ओळख आहॆ. त्यानी सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्यामुळे त्यांना संघटनेने ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहॆ.

हैस वेल्फेअर राष्ट्रीय फाउंडेशन च्या नाशिक विभागाच्या व उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची नियुक्ती देश पातळीवर मानव अधिकार अन्द्री ड्रग्स अन्ट्री करप्शन भ्रष्टाचार आणि पर्यावरण बचाव व गरीब लाभार्थी योजने अंतर्गत सामाजिक एकोपा या विषयावर आधारित राष्ट्रीय पातळीवर काम करीत असलेल्या फाउंडेशनच्या नाशिक विभागाच्या विभागीय अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता पारोळा तालुक्यातील पिंपरी मोढाले येथील रहिवासी गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची मुंबई येथे झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात हैस वेल्फेअर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितेश्वर सिंह बेदी यांच्या हस्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची नाशिक विभागणी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव ढगे पाटील होते त्याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमीत सिंग तुंग व राष्ट्रीय चेअरमन मा. नीरज भल्ला. प्रदेश प्रचार प्रमुख बापूराव ढगे पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलासराव पवार, प्रदेश सचिव अझर पटेल साहेब महिला प्रदेशाध्यक्ष दिपाली खान मुंबई महिला अध्यक्ष सुभदा विचारे विधी सल्लागार अँड. लक्ष्मण बेडेकर उपाध्यक्ष विद्या हाके, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोरसे व राज्यातील  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात हैस वेल्फेहर फॉउंडेशनच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच गरीब कुटूंबाला मोठया प्रमाणात मदत केल्याचे उदाहरण सोशल मीडियात दिसून येतात, अन्यायाला वाचा फोडली जात असून पारोळा तालुक्यातील प्रीपी येथील गुलाबराव पाटील ह्यांच्या भरीव योगदानामुळे त्यांच्यावर हैस वेल्फेहर फॉउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असे सांगण्यात आले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे