आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

टीम देवेंद्र टीम नरेंद्र मान्य नाही- पंकजा मुंडे

 

भाजपाला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही. आमच्या संस्कृतीला ‘मी’पणा अमान्य आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा असणं योग्य होतं असंही सांगितलं आहे.

डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी नियुक्ती हा पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेने मुखपत्र सामनामध्ये केलाय. यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज नाहीये. भाजप मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटत नाही. सामनात काय लिहिलंय ते मी वाचलं नाही. पंतप्रधान मला संपवण्याचा प्रयत्न करतील इतकी मी मोठी नाही असं म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे