पाचोऱ्यात मानवधर्माची शिकवण देणारे संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले

पाचोरा शहरात मानवधर्माची शिकवण देणारे संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथी निमित्ताने पाचोरा शहर तेली समाज व विश्वस्त मंडळाच्यावतीने श्री संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून पालखी सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
संताजी महाराज यांनी लिहिलेल्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेमुळे संत तुकाराम महाराजांचे विचार आणि त्यांनी बहुजन समाजाला दिलेला संदेश आजही आपल्याला समजतो. संतांचे अभंग व ओव्या अजरामर असून त्यांच्या विचारांच्या मार्गाने चालणे हीच खरी पुण्यतिथी असल्याचे सांगितले जाते. सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांचे प्रतिमापूजन व सत्यनारायणाची महापूजा पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सीमा चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व सत्यनारायणाची विधिवत महापूजा करून, विविध रंगीत फुलांनी सजवलेल्या पालखीतून श्री संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा पालखीत ठेवून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली, संत जगनाडे महाराज यांची पालखी सोहळा तेली समाजाच्या कार्यालया पासून जवाहर हाऊसिंग सोसायटी परधाडे रोड पंचमुखी हनुमान चौक मार्गे भजनी मंडळाने टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. तसेच तालुक्यातील तेली समाजातील सर्व कुटुंबासाठी आणि परिसरातील सर्व समाजातील गोरगरीब नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पाचोरा तालुका तेली समाजाचे अध्यक्ष सतीश चौधरी, शहराध्यक्ष नारायण चौधरी, सचिव शांताराम चौधरी, उपाध्यक्ष डॉ उत्तम चौधरी, सहसचिव शरद चौधरी, संचालक बंडू चौधरी, प्रकाश जिभाऊ पी एन चौधरी, प्रा सी एन चौधरी, मोतीलाल चौधरी, छोटू चौधरी, संजय चौधरी, भालचंद्र चौधरी, रघुनाथ चौधरी, विष्णू चौधरी, एकनाथ चौधरी, सुधाकर चौधरी, भरत चौधरी, नितीन चौधरी, राजेश सपकाळ, गोपाल चौधरी, विजय चौधरी, दिनकर चौधरी, बापू चौधरी, किशोर चौधरी, जगदीश चौधरी, आबा चौधरी, शांताराम चौधरी, ईश्वर चौधरी, जगन्नाथ चौधरी, शिवाजी चौधरी, सुभाष चौधरी, आकाश चौधरी, महेश चौधरी सह सर्व समाज बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचोरा शहर तेली समाज विश्वस्त मंडळाने परिश्रम घेतले.




