आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत पती-पत्नीचा विजयी गुलाल..

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचे (Shivsena Shinde Group) आमदार किशोर आप्पा पाटिल नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने पाचोरा नगरपरिषद आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा दुआ उडवला  व एकहाती विजय मिळवली.

आज पाचोरा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला असून भाजप पक्षाला चांगला च धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 07 चे उमेदवार अ जागेतील उमेदवार प्रवीण ब्राह्मणे व त्यांच्या पत्नी ब जागेतील उमेदवार वर्षा प्रवीण ब्राह्मणे यांचा विजयाची चर्चा जिल्ह्याभरात होत आहे. ब्राह्मणे पती पत्नी एकाच प्रभागात एकाच पक्षातून निवडून आले प्रवीण ब्राम्हणे यांनी माजी सभापती भाजपचे सतीश शिंदे यांचा पराभव केल्याने बंगल्यावाल्या विरोधात रस्त्यावरील उमेदवाराचा विजय झाल्याने  चर्चा होतांना दिसून येत आहे.

जनतेच्या समस्यांचे निवारण हेच आमचे लक्ष हा उद्देश ठेऊन आम्ही प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुक लढलो आणि जिंकलो ही लढाई बंगल्यावाल्या विरोधात रस्त्यावरील व्यक्ती ची होतीअसे जिंकून आल्यावर प्रतिक्रिया प्रवीण ब्राह्मणे यांनी दिल्या. सामान्य व्यक्तिमत्व असणारे प्रवीण ब्राह्मणे हे आमदार किशोर आप्पा पाटिल यांच्या मार्जितले कार्यकर्ते म्हूणन ओळख आहे. पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे