ब्रेकिंग

पाचोरा प्रभाग क्र. 01 मधील शिवसेना पक्षाचे उमेदवार किशोर आप्पा बारवकर यांना प्रभागात वाढता पाठींबा

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 01 मधील शिवसेना पक्षाचे उमेदवार किशोर आप्पा बारवकर यांना प्रभागात वाढता पाठींबा मिळतांना दिसून आला परिसरातील नागरिकांकडून त्यांना उल्लेखनीय असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटिल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख ले जातात उमेदवार किशोर आप्पा बारवकर हे  शहरातील सर्वपरिचित चेहरा म्हणून ओळख असलेले बारवकर आप्पा यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची जनतेला अद्यापही जाणीव असून, त्या विश्वासाचा फायदा यांच्या प्रचाराला मिळताना दिसत आहे. जमेची बाजू म्हणजेच पाचोऱ्यात विकास हा फक्त शिवसेनेने केला असल्याचे नागरिकांचे मत आहे.

कोविड महासाथीच्या काळात अनेकजण परस्परांपासून दूर राहात असताना बारवकर आप्पा यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो रुग्णांच्या मदतीसाठी धडपड केली. त्या काळात दाखवलेली त्यांची सेवाभावाची भावना लोकांच्या मनात घर करून राहिली आहे. 

किशोर आप्पा बारवकर यांनी राजकीय क्षेत्रातून अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याचा हेतू असून प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध करून देत प्रभागातील मूलभूत अडचणी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे बारवकर आप्पा यांनी बोलतांना सांगितले.

प्रचारादरम्यान महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे आणि सामाजिक कार्या मुळे नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाल्याचे दिसत आणी वॉर्ड क्रमांक 01 मधील वाढता जनसमर्थनाचा कल लक्षात घेता ब जागेतील शिवसेनेचे उमदेवार किशोर आप्पा बारवकर आणि अ जागेतील मनीषा बाविस्कर हे या निवडणुकीत लक्षवेधी उमेदवार ठरत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे