पाचोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक 11 मधील अ जागेतील आणि प्रभाग क्रमांक 12 मधील ब जागेतील निवडणुक ऐनवेळी स्थगित!

पाचोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक 11 मधील अ जागेतील आणि प्रभाग क्रमांक 12 मधील ब जागेतील निवडणुक ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना राज्य निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक प्रक्रियेबाबत दाखल झालेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयाचा निकाल येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, अंमळनेर, सावदा, यावल वरणगाव, भुसावळ नगर पालिकेच्या काही प्रभागातील निवडणुक ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या आहेत तसेच बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगावसह दहा नगरपरिषदा स्थगित करण्यात आल्यामुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय तात्पुरता असून, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नव्याने मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, निवडणूकांच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीनंतर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



