पाचोरा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेला वाढता पाठींबा..

- दिलीप जय परदेशी
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरलेले अँड योगेश पाटिल (दादू वकील) आणि जयश्री नंदू पाटिल (नंदू बालाजी यांच्या पत्नी) यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून प्रभागात त्यांच्या प्रचाराची जोरदार चर्चा आहे. प्रभागामधील घरदार भेटी, पदभ्रमण, आणि भव्य रॅलींच्या माध्यमातून या शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार अधिक व्यापक होत असून सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सुनीताताई पाटिल यांच्या नेतृत्वात अँड योगेश पाटिल (दादू वकील) आणि जयश्री नंदू पाटिल यांनी यांनी प्रभागातील प्रमुख भागामध्ये दौरे केले. स्थानिक व्यापारी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कामकाजाची भूमिका तसेच प्रभाग विकासाच्या संकल्पनांची माहिती दिली. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता नियोजन, उद्याने आणि नागरी सुविधांचा विकास यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्या नंतर आमदार किशोर आप्पा पाटिल यांची सभा ठरली गेम चेंजर ठरणार असे दिसत आहे या सभेला मोठया संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पदभ्रमणादरम्यान अनेक नागरिकांनी त्यांचे स्वागत करून आपापल्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा व्यक्त केल्या, रॅलीदरम्यान प्रभागात उत्साही वातावरण पाहावयास मिळाले. यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या रॅलीला मोठी उपस्थिती लावली. अनेक ठिकाणी व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक मंडळांनीही त्यांना शुभेच्छा देत सहकार्याची भावना व्यक्त केली. काही ठिकाणी महिलाना त्यांना ओवाळून प्रचारात सहभागी होत असल्याचेही दिसून आले. तर युवकांनी सोशल मीडियावरूनही त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद दिल्याचे निदर्शनास आले.
प्रचार अंतिम टप्प्यावर असतांना शिवसेना नगराध्यक्ष उमेदवार सुनीताताई किशोर पाटिल आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अँड योगेश पाटिल (दादू वकील) आणि जयश्री नंदू पाटिल यांचा प्रचार अधिक रंगतदार झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांबाबत सकारात्मक चर्चा दिसत आहे.




