प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपच्या सीमा पाटिल यांना सर्वच वयोगटातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक दहा मधील ब जागेतील सौ सीमाताई समाधान पाटिल यांनी आपल्या दमदार प्रचारामुळे भक्कम आघाडी घेतली आहे. प्रभागातील विविध वस्ती, शेजारी, गल्लीबोळात त्यांचा प्रचार जोरदार वेगाने सुरू असून सर्वच वयोगटातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक दहा मधून अ जागेतून सूरज वाघ आणि ब जागेच्या उमदेवार सीमा समाधान पाटिल यांनी मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्या प्रयत्नशील आहेत, -पाणी-स्वच्छता अशा अत्यावश्यक सुविधांसोबतच समाजकल्याण, महिलाविकास आणि पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या कार्यशैलीत असलेली साधेपणा, लोकाभिमुखता आणि प्रामाणिकपणा ही जमेची बाजू बघितली जात आहे. या मुळेच प्रभागातील मतदारांना “शोभाबाईच हव्यात” असे स्पष्टपणे सांगताना दिसत आहेत.
लोकांप्रती असलेली बांधिलकी यांचे विशेष कौतुक केले. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे मतदारांनी सांगितले. सध्या चालू असलेल्या प्रचार दौऱ्यात सीमा समाधान पाटिल यांनी प्रत्येक घरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रभागातील पुढील विकास आराखडा समोर मांडला आहे.
“प्रभागातील पाणीपुरवठ्याची अधिक काटेकोर व्यवस्था आणि सुरक्षित वातावरण” यांसारखी अनेक मुद्दे त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात मांडले आहेत. प्रचारादरम्यान कार्यक्रमस्थळी गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग पाहता प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांची निवडणूक लढत अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र दिसत आहे.



