हायकोर्टाचा मोठा दणका | नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्या जाहीर होणार नाही

Municipal Council Elections 2025 Result Date: मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्या जाहीर होणार नाही, हायकोर्टाचा मोठा दणका दिला असून नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होईल.राज्यातील नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीतल डावात मचाळा अजून थांबलेला नाही. नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या लागणार होता. पण तो आता लांबणीवर पडला आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Mumbai High Court of Nagpur Bench) सर्व निकाल हा 21 डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एक्झिट पोलही सध्या जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्या मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार नाही. आता निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.



