कुसुंबा येथील वरचा प्लाॅट भागातील नालेसफाई आणि काटेरी झाड काढुन साफसफाई करण्यात आले

कुसुंबा (ता. धुळे) कुसुंबा ग्रामपंचायत हद्दीतील वरचा प्लाॅट भागातील नालेसफाई आणि काटेरी झाड काढुन साफसफाई करण्यात आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
या भागातील सांडपाणी निचरा सारखी गंभीर समस्या होती तसेच काटेरी झाडे खुप मोठ्या प्रमाणात होते. आणि रहिवाशांचे म्हणण्यानुसार बिबट्या वावर ही आहे. ह्या समस्यांनी येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त होते.
परिसरातील रहिवाशांनी आपली गाऱ्हाणी समाज सेवक ॲड. श्री.योगेश छबिलाल परदेशी यांच्याकडे मांडली आणि योगेश परदेशी यांनी स्वखर्चाने जेसीबी च्या माध्यमातून नालेसफाई आणि काटेरी झाडे झुडपे काढुन रस्ता मोकळा केला.
जेसीबी च्या सहाय्याने इतरत्र पसरणारे सांडपाणीसाठी नाली तयार केली, रहीवासी यांच्या समाधान आणि आनंद दिसुन आले.वरचा प्लाॅट येथील रहिवाशांकडून सेवेची संधी दिल्याबद्दल ॲड. योगेश परदेशी यांनी आभार मानले.



