पाचोरा नगर परिषद निवडणूक काँग्रेस स्वबळावर ..?

पाचोरा व भडगाव तालुक्यात शिवसेना भाजपा यांच्या युती न होता स्वबळावर निवडणूक लढण्याचे आधीच संकेत दिले होते, मात्र महाविकास आघाडी आता पर्यंत एकत्र पत्रकार परिषद घेत होती परंतु आता लढाईला तोंड फुटण्याची वेळ जवळ आली असताना मात्र आघाडीत मतभेदाची पेरणी सुरू झाली असल्यामुळे काँग्रेसने आम्ही स्वबळावर सर्व जागा लढवू असे घोषित केले.
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. नगर परिषद निवडणूकांसाठी उमेदवारांचे नामांकन भरण्याची तारीख १० ते १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. २ डिसेंबरला निवडणूक तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्या करण्याची तयार विविध पक्षात सुरु आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यात शिवसेना भाजपा यांच्या युती होता स्वबळावर निवडणूक लढण्याचे आधीच संकेत दिले होते, मात्र महाविकास आघाडी आता पर्यंत एकत्र दिसत होते महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते यांच्यात मिठाचा खडा पडल्याने काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असे सांगण्यात येत आहे.
पाचोरा शहरातील काँग्रेसचे सचिन सोमवंशी हे जात पात न बघता मदतीला धावून येतात व अल्पसंख्यांक मतदार हा काँग्रेस सचिन सोमवंशी यांच्याकडे चांगला आकर्षित होतो यांचा फायदा महाविकास आघाडीला नक्कीच होणार असल्याचे दिसून येत होते आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आघाडित बिघाडी झाल्याने यांचा फायदा काँग्रेसला नक्कीच होईल असे सांगण्यात येत आहे.



