आपल खान्देश

बदलापूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा मोठया थाटात…

बदलापूर | सकल धनगर समाज बदलापूर ठाणे जिल्हा आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त बदलापूर येथे विविध कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्ती, समाज भूषण पुरस्कार, देऊन मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सरकार ने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्यात विशेष घोषणा आणि कार्यक्रम आयोजित केले. विविध संस्था, राजकीय पक्ष आणि स्थानिक समित्यांनी जयंतीनिमित्त राज्यभर आणि विशेषत : जन्मस्थळी कार्यक्रम आयोजित केले. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात सकल धनगर समाज बदलापूर ठाणे जिल्हा आयोजित यांनी बदलापूर मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रीशताब्दी जयंती विविध कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्ती, समाज भूषण पुरस्कार, देऊन उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात  ज्ञानेश्वर भाऊ परदेशी यानी प्रास्ताविकेने केले. त्यानंतर धनगर इतिहासकार माननीय  बापूसाहेब हटकर यांनी समाजाला संबोधिले, त्यानंतर माननीय  प्रकाश चऱ्हाटे,  शंकर लबडे  यांनी धनगर समाजाला मार्गदर्शन केले. श्रीमती अपर्णा परदेशी यांनी आपली कविता सादर केली. त्यानंतर समाजसेवक माननीय यशपाल भिंगे साहेब यांनी समाजाला मार्गदर्शन केले. तसेच कु. निर्वी गणेश गढरी हिने आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री बापूसाहेब देवीदास हटकर , माननीय श्री रुपेश थोरात साहेब, माननीय श्री यशपाल भिंगे साहेब, माननीय श्री प्रकाश चऱ्हाटे साहेब, माननीय श्री शंकर कोळेकर साहेब, माननीय श्री वसंत देवकाते साहेब, माननीय श्री शंकर लबडे साहेब, माननीय श्री संदीप माने साहेब, माननीय श्री संदीप पांढरे साहेब, माननीय श्री सुमित लोखंडे साहेब माननीय श्री डोंगरसिंग गढरी साहेब, माननीय सौ अपर्णा परदेशी मॅडम, इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

समाजातील ज्येष्ठ समाजसेवक श्री शंकर लबडे साहेब, उद्योजक माननीय श्री रुपेश थोरात साहेब, गड किल्ले अभ्यासक श्री.सुमित लोखंडे साहेब, शैक्षणिक कार्य करणारे श्री. दुर्योधन देवकाते साहेब, जीएसटी अधिकारी श्री रोहित मारकड साहेब, लेखिका कवयित्री सौ अपर्णा परदेशी मॅडम, गायक लेखक संगीतकार श्री मुकेश धनगर, समाजसेवक श्री. सागर डोंगरसिंग गढरी साहेब, माजी.शिक्षणाधिकारी मुंबई श्री प्रकाश चऱ्हाटे साहेब, उद्योजक श्री सुभाष वरखडे साहेब, व्यावसायिक श्री युवराज अघडते साहेब, शो डायरेक्टर अनंता गिल्ले साहेब, ट्रस्टी आदर्श हायस्कूल श्री पंढरीनाथ बाविस्कर साहेब, मुंबई अग्निशमन दल श्री सुखदेव सरगर साहेब, सभाज सेवक महावितरण अधिकारी श्री रवींद्र फकीरा परदेशी साहेब, समाजसेवक धनगर समाज संघर्ष समिती चे नवी मुंबई अध्यक्ष श्री संदीप पांढरे साहेब यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 कार्यक्रमाला मेहनत घेणारे श्री ज्ञानेश्वर भाऊ परदेशी साहेब, श्री महेश दिनवले साहेब, श्री दुर्योधन देवकाते साहेब, श्री सुधाकर ठोके साहेब, श्री गणेश गढरी साहेब, विजय मनोरे साहेब,श्री इंद्रजीत भदे साहेब, श्री सुभाष वरखडे साहेब, श्री राजेंद्र धोंडू गढरी साहेब, डोंगर सिंग आबा परदेशी साहेब, श्री रोंडाळे साहेब, श्री धनराज बकले साहेब.विनोद धनगर, सोमनाथ हुलगे, गोविंद खांडेकर इ. समाज बांधवांनी मेहनत घेतली, बदलापूर मधील धनगर समाज खूप मोठ्या संख्येत उपस्थित असल्याबद्दल माननीय सुधाकर ठोके साहेबांनी समाजाचे आभार मानले.

तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री बापूसाहेब देवीदास हटकर , माननीय श्री रुपेश थोरात साहेब, माननीय श्री यशपाल भिंगे साहेब, माननीय श्री प्रकाश चऱ्हाटे साहेब, माननीय श्री शंकर कोळेकर साहेब, माननीय श्री वसंत देवकाते साहेब, माननीय श्री शंकर लबडे साहेब, माननीय श्री संदीप माने साहेब, माननीय श्री संदीप पांढरे साहेब, माननीय श्री सुमित लोखंडे साहेब माननीय श्री डोंगरसिंग गढरी साहेब, माननीय सौ अपर्णा परदेशी मॅडम, इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे