ब्रेकिंग

जळगावात २५ मे ला आपली सावली होणार गायब!

जळगाव : सूर्य डोक्यावर येऊन आपली सावली  गायब होण्याचा वर्षातून केवळ दोनदा येणारा योग येत्या २५ मे रोजी अनुभवास मिळणार आहे.

सूर्य दररोज दुपारी १२ वाजता डोक्यावर येतो, असे मानले जाते. प्रत्यक्षात, तसे रोज होत नाही. सूर्य वर्षातून फक्त दोनच वेळेस आपल्या डोक्यावर येतो. सौर घड्याळ (सनडायल) नुसार १२ वाजता व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) १२ वाजून काही मिनिटांनी डोक्यावर येतो आणि आपली सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडते. निसर्गाच्या या अदभूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शॅडो डे’ असे म्हणतात.

२५ मी रोजी सूर्य २१.०० अक्षांशावर उगवतो त्यादिवशी १२ वाजून २४ मिनिटे ४५ सेकंद या वेळी आपण ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवतो. २१ जूननंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन (सूर्याची क्रांती) परत आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे ‘शून्य सावलीचा क्षण’ आपल्याला अनुभावास मिळतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे