ब्रेकिंग

Pachora | जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये घवघवीत यश..

  • झूम ऑनलाईन मीडिया

पाचोरा |  तालुकास्तरीय स्पर्धेत पहिल्या शालेय कॅरम स्पर्धेत जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थी विराज उकलकर याने सलग चार राऊंड जिंकून संपूर्ण तालुक्यातील शाळे मधून दुसरे स्थान पटकावले आहे. या विजयाने विराज उकलकरची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या कॅरम स्पर्धेमध्ये विराज उकलकरला स्पोर्ट शिक्षक श्री निवृत्ती तांदळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच दिनांक 11 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी कै.पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालय येथे अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पाचोरा तालुक्यातील 11स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या विज्ञान मेळाव्यात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील वर्ग १०वी तील कु. श्रद्धा अनिल पाटील या विद्यार्थिनीची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल तिची शाळेतील सर्व शिक्षकांकडून कौतुक होत आहे. या स्पर्धेला पाचोरा पंचायत समितीचे शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी मा. गायकवाड मॅडम तसेच भातखंडा केंद्राचे केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार साहेब उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया,गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर,शेखरकुमार धाडीवाल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, साविता माळी, रूपाली देवरे,चेतना पाटील, अश्विनी पाटील, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, रुक्मिणी कासार, पुजा देसले,निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील,शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांनी विजेत्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे