ब्रेकिंग

ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी भाजपात? मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी निष्ठा दाखवत…

पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूकीत पराभव झालेलेल्या वैशाली सूर्यवंशी ह्यानीं ठाकरे गटातून निवडणूक लढवली होती, मात्र शिवसैनिकांनी जीवाचे रान करत गावा गावात प्रचार करत आपली ताकद दाखवली होती, आणि आज त्याच नेत्या म्हणजेच वैशाली सूर्यवंशी ह्या भाजपाच्या वाटेवर (Vaishali Surywanshi Join BJP) असल्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिक सह सामान्य नागरिकांना धक्का बसला आहे,

माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेवर आपला हक्क सांगत सर्वप्रमुख शिवसेना पदाधिकारी व स्थानिक आमदार किशोर पाटील हेही शिंदे यांच्या सोबत गेल्याने पाचोरा भडगाव ठाकरे गटात बोटावर मोजून निष्ठावंत सैनिक उरले असतांना दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी राजकारणात पाय ठेवला आणि शिवसैनिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या, तमाम शिवसैनिकांनी वैशाली सूर्यवंशी यांना आमदार बनवून आपली खरी निष्ठा खरी उतरवू मात्र मागील विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांचा दारुण पराभव झाल्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आणि आता स्वतःला निष्ठावंत समजणाऱ्या वैशाली सूर्यवंशी ह्या  ठाकरे गटालाच जय महाराष्ट्र म्हणत भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी पत्रक काढून आम्ही उद्धव ठाकरे गटातच आहोत असे स्पष्टकरत…

स्वयंघोषित नेता गेल्या काही दिवसांपासुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाचोरा तालुका व पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नसलेले स्वयंघोषीत नेते येणाऱ्या काळात पक्षांतर करुन भाजपात किंवा अन्य गटात जाण्याच्या चर्चा मतदारसंघात सुरु आहेत.

या पक्षांतराबाबत आम्ही खालील सह्या करणार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी जाहीर करतो की, कोणी कुठेही पक्ष प्रवेश करत असतील तरीही आम्ही प्रमुख पदाधिकारी पक्षाशी एकनिष्ठ असुन आम्ही सर्व उध्दवसाहेबांवर विश्वास ठेवुन शिवसेना या आमच्या मुळ पक्षातच आहोत. पक्षांतर करणारे काही लोक अफवा पसरवत आहेत की, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सुध्दा स्वयंघोषीत नेत्यासोबत भाजपात वा अन्यत्र जात आहेत. हि केवळ अफवा असुन आम्ही कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश करत नसुन आम्ही शिवसेना उध्दवबाळासाहेब ठाकरे पक्षातच आहोत.

जर कोणी आमच्या पक्षांतराबाबत खोटी माहीती पसरवत असतील तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व जनतेने या भामट्यांच्या अफवांवर विश्वास ठेवु नये व शिवसेना उध्दवबाळासाहेब ठाकरे पक्षाशी ठाम रहावे असे आवाहन आम्ही सारे करीत आहोत.

असे नमूद करत प्रसार माध्यमातून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. लवकर च वैशाली सूर्यवंशी भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे